कोल्हापूर: राज्यभरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असताना कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे काही काळासाठी येथे तणाव निर्माण झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील महाद्वार रोडवर ही घटना घडली. आज सकाळपासून याठिकाणी शांततेत विसर्जन पार पडले. मात्र, संध्याकाळच्या सुमारास विसर्जन मिरवणुकांची संख्या वाढल्याने महाद्वार रोडवर मोठी गर्दी झाली होती. विसर्जन मिरवणुकांचा हा मुख्य रस्ता आहे. शहरातील प्रत्येक मंडळाला या प्रसिद्ध रस्त्यावर निवडणूक थांबवायची असते. त्याप्रमाणे एका मंडळाने आपल्या मिरवणुकीचा वेग संथ केला. त्यामुळे पाठीमागे अनेक गणपतींची रांग लागली.


तेव्हा पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिरवणूक पुढे नेण्यास सांगितले. मात्र, तरीही या मंडळाने मिरवणूक महाद्वार रस्त्यावरच रेंगाळत ठेवली. त्यामुळे पोलिसांनी या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे महाद्वार रस्त्यावरील विसर्जन मिरवणुका थांबल्या होत्या. अखेर या मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्यात पोलिसांना यश आले व मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाली.