पुणे : शहरातील एका संशोधकाने प्लास्टिक आणि थर्माकोल खाणाऱ्या अळ्यांचा शोध लावला आहे. या आळ्या केवळ  प्लास्टिक  खातच नाहीत तर ते पचवतातही.  प्लास्टिकचं विघटन करण्याचा नैसर्गिक मार्ग पुण्यातल्या डॉ. राहुल मराठे यांनी शोधून काढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मित्रकिडा या संस्थे मार्फत शेतकऱ्यांना उपयुक्त किड्यांची निर्मीती करणाऱ्या डॉ. मराठे यांनी 'वॅक्स मॉथ' या अळ्या पाळल्या होत्या. या अळ्यांपासून उसावर पडणाऱ्या किडीला उपाय असणाऱ्या कृमींची पैदास करण्याचा त्यांचा मानस होता. 


मात्र प्लास्टिक कॅरिबॅगमध्ये ठेवलेल्या या अळ्यांनी काही दिवसांत कॅरिबॅगच फस्त केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. आणि मराठे यांच्या संशोधनाला एक वेगळीच दिशा मिळाली.