COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून सांगली जिल्ह्याला मदत केली आहे. या जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील जलपूर्ती परियोजनेसाठी १५ लाख रुपयांची मदत केली आहे. 


तासगाव तालुक्यातल्या तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख संजय बारकुंड यांनी ही माहिती दिली. या केंद्रातल्या पाणीपुरवठा योजनेला अर्थसहाय्य करावं म्हणून आपण अनेक दिग्गजांना लेखी निवेदन दिलं होतं. पण सचिन तेंडुलकर यांचा अपवाद वगळता कुणीच आपल्याला दाद दिली नसल्याचं बारकुंड यांनी सांगितलं. यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. या योजनेंतर्गत खासदार राज्यातील एका किंवा अधिक जिल्ह्यात कार्य करण्याच्या हेतून ते निवडू शकते. सचिन यांनी मात्र आमचं निवेदन मिळताक्षणी त्यांच्या खासदार निधीतून १५  लाख रुपये मंजूर केल्याचं बारकुंड यांनी सांगितलं.


या अगोदर राज्यसभेतील त्याच्या अनुपस्थितीची चर्चा रंगत असताना खासदार निधीतून त्याने सरकारी रुग्णालयाला मदत देण्याची उत्सुकता दाखवून दिल्याचे समोर आले आहे. सचिनने रुग्णालयातील अत्याधुनिक एक्स रे मशिन आणि अन्य सामग्रीसाठी खासदार निधीतून तब्बल २५ लाखांची मदत देणार आहे. या निधीच्या माध्यमातून एर्नाकुलम सरकारी रुग्णालयातील गरीब जनतेला फायदा होणार आहे.