पुणे : राष्ट्रवादीचे मंत्री नबाव मलिक यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना अटक केलीय. विरोधी पक्षाने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तसेच, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने नबाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असे स्पष्ट केलंय. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक असा उभा संघर्ष निर्माण झाला असताना आता शरद पवार यांनी नारायण राणे याच्याकडे उंगलीनिर्देश केलाय.


मंत्री नवाब मलिक यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई झाली आहे. मुस्लिम असलेल्या व्यक्तीचा संबंध दाऊदशी जोडण्यात येत आहे. आमचे जुने सहकारी नारायण राणे यांनादेखील अटक झाली होती. ते आज केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्यावरही आरोप झालेत. त्यांना अटक झाली. मग, त्यांचा राजीनामा का घेत नाही याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी उद्या पुण्यात येताहेत तेव्हा करावा. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असे होऊ शकत नाही. असे सांगत पवार यांनी मलिक यांची पाठराखण केली.


कोश्यारी सर्वात कर्तृत्ववान राज्यपाल
महाराष्ट्रात आतापर्यंत जितके राज्यपाल येऊन गेलेत त्यापैकी भगतसिंह कोश्यारी हे आतापर्यतचे सर्वात कर्तृत्ववान राज्यपाल आहेत असा टोला पवार यांनी लगावला. केंद्राची पातळी घसरली आहे. याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात राज्यपालांच वर्तन असल्याचंही ते म्हणाले.