गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोण बाजी मारणार? आज होणार फैसला
गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार जवळपास बंद असले तरी, निवडणुका मात्र नियोजित कार्यक्रमानुसार सुरू आहेत. रविवारी संघाची पंचवार्षिक निवडणुक पार पडली होती.
कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. गोकुळचे एकूण 3650 सभासद आहेत. त्यापैकी 3639 जणांनी मतदान केले होते. निवडणुकीच्या वेळी मतदारांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवण्यात आले होते.
कोल्हापूरातील रमणमळा इथल्या बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी आघाडी अशी थेट लढत आहे. गोकूळ दूध संघासाठी 99.78 टक्के मतदान झालं आहे.
सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पालीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान कर्मचारी आणि प्रतिनिधी यांचे RTPCR रिपोर्ट पाहूनच आत प्रवेश दिला जात आहे.
मतमोजणी नेमकी कशी केली जाईल
पहिल्यादा प्राथमिक फेरी होईल.
यामध्ये मतपत्रिकेची संख्या केंद्रनुसार जुळते का हे पाहिलं जाईल
त्यानंतर मतदारसघानुसार मतमोजणी होईल
एकून 18 टेबलावर मतमोजणी केली जाणार आहे.