मुंबई :  कोरोना संसर्गामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू होणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेली कोल्हापूरची अंबाबाई होय. 7 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी प्रशासनाने अंबाबाईच्या मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून ई पासची व्यवस्था केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली होती. राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे घटस्थापनेपासून मंदिरे उघडण्यात येत आहेत.  


तरी मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरतर्फे ई पास जारी करण्यात आली आहे. ई पासच्या मिळवल्यानंतरच भाविकांना नवरात्र काळात दर्शन मंदिरात दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी https://www.epass.mahalaxmikolhapur.com/MahalaxmiEPassSeva/dbooking/index  लिंक वर भाविकांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. ऑनलाईन नोंदणी करून पास मिळाल्यावरच अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. ही लिंक तीन दिवसांसाठी सुरू असणार आहे.उर्वरित स्लॉट पुढील तीन दिवसांनी ओपन होतील.