कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीतील रंगत आता वाढत चालली आहे. काँग्रेस नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या करुणा मुंडे यांनीही या निवडणुकीत उडी घेतलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाला. आमदार जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी 12 एप्रिल रोजी मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्याचे लक्ष लागले आहे.
 
राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणी करणार असल्याचे सुतोवाह केले होते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'कोणीतरी ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगत आहेत. माझं वर बोलणं सुरू आहे असं काही नेते सांगत आहेत. पण, माझ्यावर कोण आहे हे मला माहित नाही, असा टोला लगावला आहे.


भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच, ही पोटनिवडणूक काही केल्या लढवणार अशा प्रकारची भूमिका जाहीर करून उमेदवार देखील निश्चित केला आहे. 


दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप क्ररुन चर्चेत आलेल्या करुणा शर्मा या ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनीच स्थापन केलेल्या शिवशक्ती सेनेच्या त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. गेले काही दिवस पक्षातर्फे उमेदवार कोण असेल यावर झालेल्या विचाराअंती करुणा शर्मा यांनी निवडणुक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. 



नेमकं कोणत्या पक्षाकडून कोण निवडणूक लढविणार आहेत ते पाहू 


दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या काँग्रेसकडून रिंगणात असणार आहेत.


भाजपकडून नगरसेवक सत्यजित कदम हे निवडणूक रिंगणात असतील. 


आपकडून संदीप देसाई हे निवडणूक लढविणार आहेत


शिवशक्ती सेनेकडून करुणा मुंडे ह्या निवडणूक रिंगणात असणार आहेत.