पुणे: मराठेशाहीच्या देदिप्यमान इतिहासाचा विषय निघाला की पेशव्यांचा उल्लेख हा अनिवार्यच ठरतो. त्यामध्येही थोरले बाजीराव आणि मस्तानी हा कायमच अनेकांच्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय राहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच मस्तानीच्या वंशजांनी सोमवारी पुण्यातील पेशव्यांचे निवासस्थान राहिलेल्या शनिवारवाड्याच्या वास्तूला भेट दिली. हे सर्वजण पहिल्यांदाच शनिवारवाड्यात आले होते. यामुळे बाजीरावांच्या पराक्रमाच्या आणि मस्तानीबरोबरच्या जिंदादिल प्रेमाची कहाणी सांगणारा हा अभेद्य शनिवारवाडाही आज थोडा रोमांचित झाला असावा.


मस्तानीचे वंशज मध्य प्रदेशात राहतात. ते पहिल्यांदाच पुण्यात आले. त्यांनी शनिवारवाड्यासह केळकर म्युझियममधल्या मस्तानी महालालाही भेट दिली. पाबळला मस्तानी समाधीलाही ते भेट देणार आहेत.