पुण्यातील या नेत्याचा मनसेला जय महाराष्ट्र !
मनसेचे माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे - मनसेचे माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. माझीरे हे मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. वसंत मोरे पक्षात साईडलाईन झाल्यानंतर मनसेला हा पुण्यातील मोठा धक्का मानला जात आहे.
मी पक्ष सोडण्याचं मुख्य कारण म्हणजे मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर तसेच कोअर कमिटीतील इतर सदस्य असल्याचं सांगत माझिरे यांनी पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. "19 मे रोजी मी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांत आल्या होत्या त्यानंतर माझिरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर बाबू वागस्कर यांनी तू पक्षात राहणार आहे. का ? अशी विचारणा केली होती. मला बोलावून घेऊन विचारता तुम्ही पक्षात पाहणार आहात का ? ही हुकूमशाहीच सुरु असल्याचा आरोप माझीरे यांनी केला आहे.
मी याबाबत वसंत मोरेंना मेसेज केला आहे पण त्यांनी तरी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी किती वेळा बोलावं की याच्यावर अन्याय होतोय. मुळात मी वसंत मोरे समर्थक असल्याने माझे माथाडी कामगार सेनेच शहराध्यक्ष पद काढून घेतले का ? असा सवाल यावेळी माझिरे मनसे नेत्यांना विचारला आहे. मी कोअर कमिटीलाच नको होतो असा घणाघात करत माझिरे यांनी मनसे सोडली आहे.
पुणे मनसेत गेल्या काही दिवसापासून अंतर्गत वाद सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून मनसेत कुरबुरी असल्याच्या चर्चा समोर येतच असतात. त्यातच आता अजून एक भर पडली आहे. निलेश माझिरे पक्षांतर्गत गटबाजीला आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकत असल्याचे सपष्ट केले. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन आहे. यांची भेट घेतली होती. ते दोन दिवसात शिवसेनेत प्रवेश करणार आहे. असं बोललं जात होते. मात्र त्यानंतर माझिरे यांनी समोर येत आपण पक्षातच राहणार असल्याचे सांगितलं होत. पंरतु आता माझिरे पुढची राजकीय दिक्षा काय ठरवणार हे पाहणे महत्तवाचे असेल.