COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : पुण्यातील औंध चोरी प्रकरणी  पोलीस शिपाई अनिल अवघडे आणि पोलीस हवलदार प्रवीण गोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस खात्याची प्रतीमा मलीन करणे आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 


पुण्यातल्या औंधमध्ये सिद्धार्थनगर भागातल्या, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये 28 डिसेंबरला रात्री 3 च्या सुमाराला 4 चोरटे घुसले, वॉचमनला दोघांनी चाकू दाखवला आणि पकडून ठेवले. दोघांनी वर जाऊन कटरच्या सहाय्यानं फ्लॅटचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. रहिवाशांनी पोलिसांना फोन केला. पोलीस गाडीवरून तात्काळ हजरही झाले. त्यांनी चोरांना पाहिलं पण बंदूक असतांनाही त्यांना पकडण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. 



त्याऐवजी पोलीस पळून जाताना दिसतायत. चार बंद फ्लॅटचं चोरांनी कूलूप तोडलं पण फारसं काही हाती लागलं नाही. एका घरातला LCD TV चोरला. पोलीसांकडे वायरलेस फोन होता. त्यांनी ठरवलं असतं तर पोलिसांनी पुढे माहिती पाठवून चोरट्यांना तात्काळ पकडू शकले असते. पण या घटनेत पोलिसांकडून तसे काहीही झालेले दिसले नाही.