मुंबई : महिलांना घराची लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा एक मुलगा लग्न करून एका मुलीला घरी घेऊन येतो, तेव्हा मुलगी तिच्या चांगल्या वाईट सवयींमुळे एकतर घर सुखी ठेवते नाही तर घर उध्वस्त करते. खरंतर ही बाब महिला आणि पुरूष दोघांबाबतही सांगता येईल.हे पूर्णपणे महिलेच्या सवयींवर आणि स्वभावावर अवलंबून असतं. आज आपण महिलांच्या ५ अशा सवयी पाहू ज्यामुळे घर उध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर लग्न करणार असाल तर त्या मुलींबाबत तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही लग्न केलेलं असेल आणि तुमच्या घरातील महिलेत या सवयी असतील तर त्या बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करा. तरच तुमचं घर सुखी राहू शकतं. 


१) आळस :


जी महिला आळशी असते, नेहमीच काम करण्याचा आळस करते त्या घरात हळूहळू नकारात्मक वातावरण पसरतं. घरात सतत भांडणं होत राहतात. महिलेच्या आळसामुळे घरातील सगळं काम सासू किंवा पतीला करावं लागतं. त्यामुळे घरात भांडणं होतात. 


२) स्वच्छता न ठेवणे : 


ब-याच महिला केवळ आपल्या शरिराची साफसफाई आणि चेह-याच्या मेकअपला महत्व देतात. पण जेव्हा गोष्ट घरातील स्वच्छतेची येते तेव्हा त्या अजिबात लक्ष देत नाहीत. अशात या अस्वच्छ वातावरणाच्या कारणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळतं. सोबतच घरात स्वच्छता नसल्याने लक्ष्मीही येत नाही. 


३) मोठ्यांचा मान न ठेवणे :


ज्या महिला आपल्यापेक्षा मोठ्यांचा मान ठेवत नाहीत, त्यांच्याशी अदबीने बोलत नाही, छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांच्याशी भांडते त्यामुळे घरात सुख-शांती अजिबातच नांदत नाही. अशा महिलेला घरी आणून पुरुष अजिबात सुखी राहू शकत नाही. 


४) चुगल्या करणे किंवा फूट पाडणे :


काही महिलांना सवय असते की, त्या घरातील सदस्यांबाबत इतके तिकडे काहीबाही सांगत असते. घरातीत सर्व गोष्टी शेजारच्यांना सांगत असते. तर काही महिला घरातील सदस्यांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा महिला घरासाठी आणि घरातील लोकांसाठी चांगल्या नसतात.