महिलांनो प्यूबिक हेयर शेव्ह करा मात्र, `या` परिस्थितीत चुकूनही नको!
प्यूबिक हेयरची योग्य पद्धतीने शेविंग केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात.
मुंबई : प्यूबिक हेयर म्हणजेच योनीमार्गाजवळ असलेले केस काढू टाकण्यासाठी बहुतांश महिला शेविंगचा पर्याय निवडतात. मात्र प्यूबिक हेयर असण्याचंही एक कारण आहे. प्यूबिक हेयर तुम्हाला योनीसंदर्भातील इन्फेक्शन होण्यापासून वाचवतात. मात्र यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. प्यूबिक हेयर काढण्याचा एक फायदा म्हणजे योनीच्या त्वचेला थंडावा मिळतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, प्यूबिक हेयरची योग्य पद्धतीने शेविंग केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. चुकीच्या पद्धतीने शेविंग केल्यास रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, पुरळ येणं, HPV तसंच इतर लैंगिक समस्या समोर येऊ शकतात.
कोणत्या परिस्थितीत प्यूबिक हेयरचं शेविंग करू नये?
इन्फेक्शन असल्यास
जर महिलांना यीस्ट इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर प्यूबिक हेयरचं शेविंग करू नये. शेविंगमुळे इन्फेक्शन पसरण्यास मदत होते. आणि असं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सेक्सपूर्वी शेविंग करू नका
जर तुम्ही पार्टनरसोबत लैंगिक संबंधांचा विचार करत असाल तर शेविंग करू नका. शेव केल्यानंतर लैंगिक संबंधांदरम्यान होणारं घर्षण त्वचेच्या जळजळीचं कारण ठरू शकतं.
पिरीयड्स सुरु असतील तर
जर तुम्ही पिरीयड्सच्या वेळी सॅनिटरी पॅड्सचा वापर करत असाल तर प्यूबिक हेयर शेविंग करू नका. योनीच्या त्वचेला सॅनिटरी पॅड सतत लागून त्वचेला त्रास होऊ शकतो.