Birth Control Methods: आजकाल बर्थ कंट्रोलचे ( Birth Control Methods ) अनेक पर्याय तुम्हाला माहिती असतील. यामध्ये कंडोम ( Condom ) आणि पाण्यासोबत घेणाऱ्या पिल्सचा समावेश आहे. मात्र आता बर्थ कंट्रोल ( Birth Control ) साठी अजून एक उपलब्ध असून फार कमी जणांना याची माहिती असल्याचं समोर आलंय. सामान्यपणे बाजारात मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या लैंगिक संबंधानंतर ( Physical intimacy ) 24 ते 48 किंवा 72 तासांच्या आत महिलांना त्याचं सेवन करावं लागतं. मात्र आता एक अशी देखील गोळी समोर आलीये, जी महिला चावून खाऊ शकतात. आणि यामुळे बर्थ कंट्रोल होण्यासही मदत होते.


गोळ्यांसाठी पाण्याची गरज नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या ( Birth Control Pills ) महिलांना पाण्यासोबत घ्याव्या लागत होत्या. मात्र या नवीन बर्थ कंट्रोल  गर्भनिरोधक गोळ्या पाण्याशिवाय चावून देखील घेऊ शकता. या गर्भनिरोधक गोळ्या ( Birth Control Pills ) इतर गर्भनिरोधकाप्रमाणेच काम करत असल्यातं समोर आलंय. 


चावून खाणाऱ्या या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन हे दोन हार्मोन्स असतात. हे दोन्ही हार्मोन ओव्हुलेशन रोखण्यासाठी तसंच गर्भधारणेचा धोका कमी करण्यासाठी काम करतात, असा दावा करण्यात आला आहे. बाजारात उपलब्ध असणारी नॉर्मल बर्थ कंट्रोल गोळी तुम्ही चावून खाऊ शकत नाही. 


कशी आहे चावून खावी लागणारी बर्थ कंट्रोल पिल्स


ही गोळी खास अशी बनवण्यात आली आहे की, ती घेण्यासाठी पाण्याची गरज लागणार आहे. या गोळीचं डिझाईन असं आहे की, चावून खाल्ल्या जावू शकतात. इतकंच नाही तर त्याचा क्रश देखील करून त्याचं सेवन केलं जाऊ शकतं.


ज्या महिलांना पाण्यासोबत गोळी घेणं आवडत नाही, अशा महिलांसाठी खास ही गोळी तयार करण्यात आलेली आहे. या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन असल्यामुळे ते अंडाशयात अंडी इंप्लांट होण्यापासून वाचवतात..


रेग्युलर बर्थ कंट्रोल पिल्स vs चावून खाण्यात येणारी बर्थ कंट्रोल गोळी


बाजारात सामन्यापणे मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या तुलनेत चावून खाव्या लागणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांना काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये असं आढळून आलंय की, चावून खाण्यात येणाऱ्या या गर्भनिरोधक गोळ्या वापरल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. 35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांमध्ये ही समस्या दिसून येऊ शकते. दरम्यान काही महिलांनी या गोळ्यांचे कण दातात अडकून राहत असल्याचीही तक्रार केलीये.