प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : मुलीचं लग्न हा वडिलांसाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी आपल्या लाडकीच्या लग्नात एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. तोदेखील अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीनं. त्यांनी मुलीची वरात चक्क शेणानं सारवलेल्या गाडीतून काढली.लग्न म्हटलं की नाचगाणं, मेंदी, नवरदेवाचं घोड्यावरून आगमन, पाहुण्यांची सरबराई हे सगळं असतंच... पण वेगळं काही केलं नाही, तर ते कोल्हापूर कसलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकिता दुधाळ हिचं लग्न वेगळं ठरलं ते या गाडीमुळे,  वरातीची गाडी म्हणजे टायरपासून टपापर्यंत फुलांनी शृंगारलेली असते. पण ही गाडी चक्क शेणानं सारवली आहे. डॉक्टर नवनाथ दुधाळ यांनी कन्या निकिताची वरात शेणानं सावरलेल्या गाडीतून काढली.



चिसौकां निकितालाही वडिलांची ही आयडिया आवडली आहे.


आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आज माझं लग्न आहे जसे प्रत्येक लग्नांमध्ये एक गाडी सस्ते फुलांनी सजवलेली आहे पण ती फुलाने नाहीतर देशी गाईच्या शेणापासून सजवली गेली आहे त्यामध्ये मी खूप आनंदी आहे - निकिता दुधाळ - वधू


वधु-वरांइतकीच त्यांची वरातीची गाडीही वऱ्हाडींचं लक्ष वेधून घेत होती. 


तापमान वाढीत शेणाचं महत्व पटवून देण्याचा छोटासा प्रयत्न डॉ. दुधाळ केला आहे, त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या प्रयत्नाचं कोल्हापुरात कौतुक होतंय.