मुंबई : ट्राफिकमध्ये, मिटींगच्या दरम्यान किंवा एखाद्या कामात व्यस्त असताना अनेकदा महिला लघवी रोखून धरतात. काहीवेळा स्वच्छ टॉयलेट नसल्यानेही महिला लघवीला जाण्यास टाळतात. तुम्हीही असं केलं असेल किंवा करत असाल...मात्र तुम्हाला माहितीये का? असं करणं तुमच्या योनीमार्गाच्या म्हणजेच vaginal health साठी फार धोकादायक आहे. इतकंच नाही तर लघवी करताना महिला अशा अनेक चुका करतात ज्यामुळे योनीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लघवी करताना महिलांकडून होणाऱ्या अनेक तुमच्या योनिमार्गाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. या चुकांमुळे तुम्हाला इन्फेक्शन किंवा किडनीच्या आजारांचा धोका होऊ शकतो. महिलांना लघवी करताना या चुका करणं टाळावं-


मागील बाजूने पुढील बाजूस पुसणं


पाठीमागून पुढच्या बाजूणे पुसणं चुकीचं आहे का? असं केल्याने मल आणि द्रव मूत्रमार्गाच्या जवळ जाऊ शकतात. यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत बाथरुममध्ये गेल्यावर समोरून मागे पुसण्याचा प्रयत्न करा. काही लोक लघवी केल्यानंतर पुसतही नाहीत. असं करू नये कारण यामुळे युटीआयचा धोका वाढतो.


लघवी रोखून धरणं


तुम्ही तुमचे लघवी धरून आहात का? असं करणं तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. असं केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. लघवी धरून ठेवल्याने लीकेज होऊ शकतं. शिवाय यामुळे UTI चा त्रासही उद्भवू शकतो.


मूत्राशय पूर्णपणे रिकामं न करणं


जर तुम्ही मूत्राशय पूर्णपणे रिकामं केलं नाही तर ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. मूत्राशय पूर्ण रिकामं न केल्यास लघवी साठून इन्फेक्शन किंवा स्टोन होण्याचा धोका वाढतो.