मुंबई : पिरीयड्स म्हणजेच मासिक पाळीचा काळ प्रत्येक महिलेसाठी फार नाजूक असतो. अशा दिवसात आरोग्याबाबत काहीही चूक झाली तरी इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक वाढतो. शिवाय मासिक पाळीत होणाऱ्या त्रासात देखील वाढ होऊ शकते. हा त्रास किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू नये यासाठी मासिक पाळी येण्यापूर्वी काही गोष्टी करणं टाळावं.


कॅफेनचं सेवन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मासिक पाळीचा पहिला दिवस महिलांसाठी अत्यंत नाजूक असतो. या दिवशी वेदनाही जास्त होतात. परंतु वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कॅफेनचं करत असाल तर तसं करू नका. चहा किंवा कॉफीच्या अतिसेवनाने तणाव वाढू शकतो. यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि मासिक पाळीच्या वेदना वाढतात.


गोड पदार्थांचं सेवन


मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी खाद्यपदार्थांचं क्रेविंग टाळणं फार कठीण असतं. अशावेळी अनेक अनहेल्दी पदार्थ तसंच गोड पदार्थांचं सेवन केलं जातं. मात्र अशा दिवसांत गोड पदार्थ खाणं टाळा. कारण यामुळे त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते.


वेदना कमी करण्यासाठी औषधं घेणं


पीरियड्स ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या दरम्यान तुम्ही पहिल्याच दिवशी वेदना कमी करण्यासाठी औषध घेऊ नका. कारण असं केल्याने तुमच्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. अशावेळी हेल्दी डाएट घेणं फायदेशीर ठरेल.