मुंबई : अनेक लोकांच्या डोळ्याला खाली काळी वर्तुळ दिसतात, वर्तुळ दिसण्याचं नेमकं कारण कळत नसलं, तरी वर्तुळ का येत आहेत, याविषयी ते सतत चिंतेत असतात. मात्र डोळ्याखाली वर्तुळं येण्याची काही कारण असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो. ती शरीरातील सर्वात पातळ त्वचा असते, असं म्हटलं जातं.


या भागातील रक्तवाहिन्या देखील लहान, नाजूक रक्तवाहिन्या असतात. या नाजूक धमन्यांमध्ये प्राणवायुयुक्त आणि प्राणवायू विरहित रक्त असतं, मात्र या ठिकाणी अतिशय पातळ त्वचा असल्याने येथील गडद रंगाचे रक्त दिसून येतं.


झोपेची वेळ हे मुख्य कारण


मात्र डोळ्याखाली वर्तुळ येण्याची काही विविधं कारणे आहेत, जसे की, कमी-जास्त झोप, अॅलर्जी, डोळे चोळणं, पाण्याची कमतरता, अनुवांशिकता, ताण-तणाव, व्यसन.


दुसरं कारणं जीवनसत्वांची कमी हे देखील एक कारण आहे. ही समस्या २५ वर्षावरील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामागे मुख्य कारण आहे, झोपेची वेळ.


एवढंच नाही, झोपेचे प्रमाण कमी जास्त झाल्याचे परिणामही डोळ्यांवर दिसून येतात. अतिप्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यासमोरही काळी वर्तुळं येतात.


काळी वर्तुळं कमी करण्यासाठी काही उपाय


अधिक काळी वर्तुळ दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम वापरा.
पुरेशी झोप घ्या, झोपेत नियमितता ठेवण्याचा प्रयत्न करा.
घरगुती साधा प्रयोग म्हणजे डोळ्यांवर काकडी ठेवा.
भरपूर पाणी प्या, यामुळे तुम्हाला अनेक बाबतीत फायदा होईल.
थंड टी बॅग डोळ्यांवर ठेवा, हे उपाय नेहमी करत राहा
टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रित करून लावा, यानेही फायदा होतो.


यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळं वाढतात


डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्याची समस्या तणावग्रस्त व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे देखील वर्तुळं वाढतात
काळी वर्तुळ कमी करण्यासाठी  परिपूर्ण असा आहार आवश्यक
ताण-तणाव असलेली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करा