Female Hygiene: इंटीमेट एरिया स्वच्छ करताना तुम्हीही करताय `या` चुका? महिलांनो सांभाळा नाहीतर...!
Female Hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजायनाच्या स्वच्छतेसाठी कधीही कोणत्या खास प्रोडक्टची गरज भासत नाही. मुळात वजायना म्हणजे योनी मार्ग स्वतःची स्वच्छता स्वतः ठेवते.
Female Hygiene: महिला त्यांच्या शारीरिक स्वच्छतेकडे भरपूर लक्ष देतात. यामध्ये वजायनल क्लिनींगकडे त्यांचं कल अधिक असतो. योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. मात्र हे प्रोडक्ट्स वापरणं योग्य आहे का? मात्र तुम्हाला माहितीये का वजायनासाठी क्लिनींग प्रोडक्ट्स वापरणं हानीकारक ठरू शकतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजायनाच्या स्वच्छतेसाठी कधीही कोणत्या खास प्रोडक्टची गरज भासत नाही. मुळात वजायना म्हणजे योनी मार्ग स्वतःची स्वच्छता स्वतः ठेवते. या प्रोडक्ट्सच्या वापराने वजायनाचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मार्केटमध्ये उपलब्ध असलेले प्रोडक्ट्स वजायनल इकोसिस्टम बिघडवू शकतात. ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. महिलांना कधीही योनी मार्ग स्वच्छ करण्याची गरज नसते. खरं तर महिलांना वल्वा ( vulva ) स्वच्छ ठेवण्याची गरज असते. जाणून घेऊया बाजारात मिळणारे प्रोडक्ट्स योनी मार्गासाठी कसे हानिकारक ठरतात.
वजायनमध्ये असतात सेल्फ क्लिनींग मेकेनिज्म
योनीला सेल्फ क्लीनिंग मानलं जातं. याचाच अर्थ योनीला कोणत्याही प्रकारच्या स्वच्छतेची गरज नसते. यामध्ये एक pH पातळी असते जी एक चांगलं मायक्रोबियल वातावरण राखण्यासाठी कार्य करते. ही यंत्रणा मृत पेशी काढून टाकते आणि नॅचुरल लुब्रिकेंट तयार करतं. योनीचे नैसर्गिक एसिडिक pH हानिकारक जीवाणूंपासून योनीचं संरक्षण करतं.
वजायनल वॉश खराब करू शकते वजायनाचं आरोग्य
तज्ज्ञांच्या मते, योनी धुण्याची किंवा स्वच्छ करण्याची कधीही गरज नसते. योनीमध्ये लैक्टोबॅसिलस नावाचे काही बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे लॅक्टिक ऍसिड तयार होते जे योनीचे एसिडिक pH राखलं जातं. यावेळी योनीला बाहेरून इन्फेक्शन होत नाही. योनी स्वच्छ करण्याच्या प्रोडक्ट्समध्ये रसायनं असतात ज्यामुळे योनीमध्ये ऍलर्जी निर्माण होण्याची शक्यता असते. या उत्पादनांचा दीर्घकाळ वापर केल्याने योनीचा pH बदलू शकतो आणि इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.
योनी मार्गाची स्वच्छता कशी राखायची
योनीमार्गाची स्वच्छता राखण्यासाठी बिकिनी वॅक्स वापरू नये. यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो.
योनी स्वच्छ करण्यासाठी दिवसातून एकदा साध्या पाण्याने योनी स्वच्छ करणं आवश्यक आहे.
जर तुम्हाला संसर्गापासून स्वतःला वाचवायचे असेल तर संभोगानंतर लघवी करा, संसर्गाचा धोका कमी असतो.
लघवी बाहेर पडल्यानंतर प्रत्येक वेळी योनी वारंवार पाण्याने किंवा साबणाने धुण्याची गरज नाही.
कॉटनचे आतंरकपडे वापरावे.
घट्ट बसणारी जीन्स किंवा इतर घट्ट फिटिंगचे कपडे जास्त काळ घालू नये.