नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचतारांकित हॉटेलमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केलाय. महिलेचा विनयभंग केल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना २९ जुलैला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडली. ३३ वर्षीय पीडित महिला मागच्या दोन वर्षांपासून हॉटेलच्या गेस्ट रिलेशन सेक्शनमध्ये नोकरी करत होती. हॉटेलचा सुरक्षा व्यवस्थापक पवन दहीया मागच्या अनेक दिवसांपासून या महिलेवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. 



२९ जुलैला त्याने पीडित महिलेला त्याच्या रुममध्ये बोलवले तिथे त्याने साडी खेचून महिलेला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान पवनच्या रुममध्ये एक व्यक्ती आली हीच संधी साधून पीडित महिला तिथून बाहेर पडली. 



दरम्यान, ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पीडित महिलेने तक्रार केली म्हणून तिलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आलेय.