मुंबई : गणेश चतुर्थीपूर्वी हरतालिका मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र, हरतालिका साजरी करण्यामागची कथा, शुभ मुहूर्त यासंदर्भात सर्वांनाच माहिती नसते. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी काही माहिती घेऊन आलो आहोत.


आधी मुहूर्त जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृतीया तिथि प्रारंभ : 11 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटं. 
तृतीया तिथि समाप्‍त : 12 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 4 वाजून 7 मिनिटं. 
पहाटेचा हरतालिका पूजा मुहूर्त : 12 सप्टेंबर 2018 सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपासून 9 वाजून 42 मिनिटांपर्यंत.


हरतालिका संबंधित माहिती


Hartalika Teej 2018 : महिला 'हरतालिकेचं व्रत' का करतात? कारण...


Hartalika Teej 2018 : हरतालिकेचं व्रत नेमकं कसं करतात?


भाद्रपद शुद्ध तृतियेला ‘हरतालिका’ असे म्हणतात


गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला ‘हरतालिका’ असे म्हणतात. या दिवशी महिला पार्वती मातेची पूजा करतात. हरतालिका या शब्दाची फोड ‘हरित’ म्हणजे ‘हरण’ करणे आणि ‘आलिका’ म्हणजे ‘आलिच्या’-मैत्रिणीच्या असा आहे. 


हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून ‘हरतालिका’ हे व्रत अत्यंत मनापासून करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात, कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये, अशी महिलांची श्रद्धा असल्यामुळे, हे व्रत आजन्म करतात.


अशा प्रकारे करतात हरतालिका व्रत


या व्रताच्या वेळी देवघराजवळ चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पाने, फुलांची पूजा केली जाते. 


धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यात जाई, शेवंती, पारिजातक, तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. यानंतर मनोभावे प्रार्थना करतात. पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी इत्यादी खेळ खेळतात.