मुंबई : कोणतीही कला ही आनंद देणारी असते. कलेचा आनंद कलाकाराबरोबरच इतरांना देखील मिळतो.  नृत्य ही आपली पारंपरिक कला आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यालाअत्यंत यशस्वी आणि मोठा इतिहास आहे. त्यातील प्रत्येक क्रियेला सुरेख अर्थ आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच शास्त्रीय नृत्य शिकण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.हे फायदे जाणून घेण्यासाठी आम्ही ठाण्याच्या होमीओपॅथिक डॉक्टर, न्यूट्रीशियनिस्ट आणि कथ्थक नृत्यालंकार अदिती देशकर-आजरेकर यांच्याशी संवाद साधला. मग जाणून घेऊया त्यांनी सांगितलेले शास्त्रीय नृत्यातून अतिशय चांगला शारीरिक व्यायाम.


आजकालची आपली जीवनशैली फारच धावपळीची आणि गुंतागुंतीची झाली आहे. अभ्यासाचा, कामाचा आणि इतर गोष्टींचा ताण अधिक वाढला आहे. त्यामुळे शरीर व मनावर खूप ताण येतो. हा ताण दूर करून मानसिक शांतता आणि समाधान देण्यासाठी शास्त्रीय नृत्याचा खूप फायदा होतो.


त्याचबरोबर आपल्या वस्त जीवनशैलीतून आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर तुमची ही तक्रार दूर करण्यासाठी देखील शास्त्रीय नृत्य कामी येते. कारण शास्त्रीय नृत्यातून अतिशय चांगला शारीरिक व्यायाम होतो.


आरोग्यदायी फायदे


  • शास्त्रीय नृत्यांनी हस्तमुद्रा, हालचाली करण्याच्या पद्धतीमुळे शरीराच्या  masculo-skeletal सिस्टीमला कोणतीही हानी न पोहचता हळुवार व्यायाम मिळतो.

  • शास्त्रीय नृत्यात विविध हस्तमुद्रा केल्या जातात. त्यामुळे हाताच्या बोटांना चांगला व्यायाम मिळतो आणि हे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध देखील झाले आहे. या हस्तमुद्रांमुळे लहान मुलींमध्ये कोऑर्डिनेशन वाढण्यास मदत होते.

  • नृत्य ही सादरीकरणाची कला आहे. त्यामुळे यात सादरीकरण, हावभाव यांना अतिशय महत्त्व आहे. शास्त्रीय नृत्यातील तोडे, तुकडे, परण, गतभाव, कवित्त, नवरस असे प्रकार करताना हावभावांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे चेहऱ्यांच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो.

  • शास्त्रीय नृत्यातील हस्तक, पदन्यास करताना दोन्हीकडे योग्य लक्ष देणे, त्यांचा ताळमेळ साधणे गरजेचे असते. त्यामुळे नक्कीच एकाग्रता वाढवायला मदत होते.

  • शास्त्रीय नृत्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याचा परिणाम शरीराबरोबरच मनावर देखील होतो.

  • उठवण्याच्या, बसण्याच्या, उभं राहण्याच्या स्थितीला एक प्रकारची सुरेख ग्रेस प्राप्त होते. 

  • नृत्याचे सादरीकरण करण्यातून आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे निश्चितच कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करण्यासाठी शास्त्रीय नृत्याची मदत होते.