मुंबई : होमिओपॅथीची औषधं घेतांना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. होमिओपॅथीचे उपचार घेताना ही पथ्य पाळली तर योग्य उपचार होवू शकतात, पथ्यामुळे औषधांचा प्रभाव चांगला टिकून राहतो.


काही महत्वाचे मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होमिओपॅथीची औषधं उघडी ठेऊ नका. 
कोरड्या आणि थंड जागेतच औषधं ठेवा. 
औषध घेतल्यानंतर बाटलीचं झाकण. 
आठवणीनं तातडीनं बंद करा.
औषधांना स्पर्श करु नका
औषध घेताना त्यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. 
बाटलीच्या झाकणातून सरळ तोंडात औषध घ्या. 
द्रव स्वरुपातलं औषध असल्यास ड्रॉपरचा वापर करा. 
त्वचेच्या संपर्कामुळे होमिओपॅथी औषधांचा प्रभाव कमी होतो.


उपचार पद्धतींचं मिश्रण करू नका


कुठलीही औषधं घेण्याआधी किंवा सोडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. होमिओपॅथी औषधं घेत असताना अॅलोपॅथी किंवा आयुर्वेदीक उपचार पद्धतींचा वापर टाळा. 


आहारातली पथ्यं


होमिओपॅथी उपचार घेताना आहारात तिव्र गंध असलेले पदार्थ टाळणं चांगलं.
लसुण, आलं, कच्चे कांदे, कॅफी यांसारख्या पदार्थांना तीव्र गंध असतो. 
तीव्र गंधामुळे होमिओपॅथी औषधांचा परिणाम कमी होतो. 


अर्ध्या तासाचा नियम पाळा


होमिओपॅथी औषधं घेण्याच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काहीही खाणं किंवा पिणं टाळा. 
साध्या पाण्याशिवाय कुठल्याही पदार्थाचं सेवन करता कामा नये, व्यसनांना दूर ठेवा
प्रभावी परिणामांसाठी धुम्रपान, दारु, तंबाखूचं व्यसन नको
काही नवीन संशोधनानुसार अर्ध्या तासाचा नियम पाळल्यास या पदार्थांचा दुष्परिणाम होणार नाही.