साहित्य :  २ वाटी मका (उकडलेले मका), ८० ग्रॅम मुगाची डाळ, ४० ग्रॅम तांदूळ, १ टेबलस्पून आलं लसून पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही रेसिपी डॉ. अस्मिता सावे यांनी सांगितलेली हेल्दी रेसिपी आहे.


कृती : सुरुवातीला मुगाची डाळ आणि तांदूळ ५ तासासाठी भिजत ठेवा. आता एका भांड्यामध्ये उकडलेले मका कुस्करून घ्या, त्यामध्ये आलं लसून पेस्ट हिरवीमिरची टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.


या नंतर मुगडाळ व तांदूळ मिक्सर मधून वाटून घ्या आणि ती पेस्ट माकाच्या मिश्रणामध्ये टाका आणि एकजीव करून घ्या. या मिश्रणामध्ये मीठ टाका आणि पाणी टाकून मिश्रण डोसाच्या पीठ प्रमाणे करा, तव्यावर कमी तेल टाकून,  गरम गरम डोसे तयार करा.