मुंबई : रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. त्यामुळे जाणून घ्या, हे रंग काय परिणाम करतात आपल्यावर. रंगाचा आरोग्यावरही थोड्या बहुत प्रमाणात फरक पडत असतो. नवरात्रीत प्रत्येक दिवशी एक असे वेगवेगळे नऊ रंगाचे कपडे परिधान करण्याचा नवा ट्रेन्ड आला आहे. मुंबईत आजचा रंग निळा आहे, तर जाणून घेऊ यात निळ्या रंगाचं महत्व नेमकं आहे तरी काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निळा रंग - हा शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे या रंगाचं वैशिष्ट्य आहे. हा रंग सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली यांची अनुभूती मिळते. 


हा रंग ज्यांना प्रिय असतो, ती माणसं स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्धाळू, सौंदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. आपण बरं की आणि आपले घरदार बरे असा यांचा स्वभाव असतो. 


वातविकारांच्या लोकांसाठी हा रंग लाभदायक ठरु शकतो. हा रंग स्वयपाक घर, किचनमध्ये वापरणे टाळा.


निळा - हा रंग शनी, राहू, केतूचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये क्रौर्य सामावलेले असते. हा रंग न्यायाचे प्रतीक आहे. हा रंग रात्री शांत आणि दिवसा उग्र असून तमोगुणी असतो. शनीची साडेसाती किंवा अडीच वर्षांच्या काळात या रंगाचे कपडे वापरू नयेत. 


निळा : मेंदूविकार, ताप आदी आजारांवर गुणकारी. कोणत्याही प्रकारच्या वेदनांवर गुणकारी. 


मकर आणि कुंभ राशींना निळा, आकाशी रंग फायदेशीर ठरतो.