मुंबई : पिरीयड्सच्या वेळी अनेक गोष्टी करण्यास महिलांना मनाई असते. त्याचप्रमाणे काही महिला पिरीयड्सच्या दिवसांमध्ये लैंगित संबंधांपासून दूर रहातात. लोकांच्या मनात पिरीयड्स वेळी सेक्स करण्यासंदर्भात अनेक प्रश्न असतात. यावेळी पिरीयड्समध्ये सेक्स करणं हे असुरक्षित वाटतं तसंच त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असं वाटतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहितीये का, पिरीयड्समध्ये सेक्स करण्याचे बरेच फायदे आहेत. तर आज जाणून घेऊया मासिक पाळी सुरु असताना लैंगिक संबंध ठेवण्याचे फायदे.


वेदनेपासून आराम


मासिक पाळीमध्ये महिलांना त्रास होतो. अशावेळी लैंगिक संबंध ठेवल्यास मासिक पाळीमुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मासिक पाळीत लैंगिक संबंध ठेवल्यास शरीरात ऑक्सिटोसिन, डोपामाइन हार्मोन्स आणि एंडोरफिंस यांची पातळी वाढते. ज्यामुळे पिरीयड्सच्या वेदना कमी होण्यास मदत होते.


मूड स्विंग कमी होतो


पिरीयड्समध्ये मूड स्विंग होणं ही स्वाभाविक गोष्ट मानली जाते. मुळात पिरीयड्स सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वीच महिलांच्या मूडमध्ये बदल होतो. अशा स्थितीत लैंगिक संबंध ठेवल्यास मूड स्विंगची समस्या येत नाही. लैंगिक संबंधांवेळी निघणारे ऐंडोरफिंस आणि ऑक्सिटोसिन हार्मोन मूड चांगला ठेवण्यात मदत करतात. 


डोकेदुखीपासून आराम


काही महिलांना पिरीयड्समध्ये डोकेदुखीची समस्या बळावते. अशावेळी काही महिला डोकेदुखी असताना लैंगिक संबंध ठेवू इच्छित नाहीत. मात्र अशावेळी लैंगिक संबंध ठेवल्यास मायग्रेनपासून आराम मिळतो.


ल्युब्रिकेंटची गरज भासत नाही


काही महिलांना सेक्सवेळी आर्टिफिशियल ल्युब्रिकेंटची गरज भासते. मात्र मासिक पाळीदरम्यान येणाला रक्तस्राव नैसर्गिक ल्युब्रिकंट असल्याने ते फायदेशीर ठरतं.