मुंबई : सध्या कॉलेज आणि सार्वजनिक स्थळांवर ग्रुप डान्स खूप प्रसिद्ध होत आहे. नुकतेच ओडिशाच्या एका कॉलेजमध्ये मुलींनी शानदार डान्स केला. हा ग्रुप डान्स आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. 
 
 ओडिशाच्या एका कॉलेजमध्ये एका मुलीने सर्वात प्रथम डान्स करायला सुरूवात केली, त्यानंतर हळुहळू सर्व मुलींनी तिला साथ दिली. मग झाला एक कमालीचा ग्रुप डान्स....



 
 या मुलींनी तीन वेगवेगळ्या गाण्यावर इंडियन ते वेस्टर्न डान्स केला. या ग्रुप डान्समध्ये बॉलिवूडचा फूल तडका पाहायला मिळतो. या ग्रुप डान्सची सुरूवात प्रभुदेवाच्या सुप्रसिद्ध मुकाबला या गाण्याने झाली. यात एक मुलीने काही बॅले स्टेप केल्या. त्यानंतर तिला अनेक जणींनी साथ दिली आणि ओरिजनल स्टेप केल्या.