ग्रहणात गरोदर महिलांनी `या` गोष्टी करणं कटाक्षाने टाळा... अन्यथा
यंदा सोमवारी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. ग्रहण गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावा असे सांगितले जाते. त्यामागे अनेक कारण आहेत.
मुंबई : यंदा सोमवारी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. ग्रहण गरोदर महिलांनी कटाक्षाने पाळावा असे सांगितले जाते. त्यामागे अनेक कारण आहेत.
असं म्हटलं जातं की, गरोदर महिलेने ग्रहण न पाळल्यास त्याचा विपरित परिणाम हा गर्भातील बाळावर होत असतो. आणि हाच परिणाम टाळण्यासाठी अनेक गरोदर महिला कटाक्षाने हा ग्रहण पाळतात. या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नये याची यादी अनेकदा ज्येष्ठ मंडळींकडून सांगितली जाते. आणि ती गोष्ट गरोदर महिला आवर्जून पाळतात. त्यामुळे खालील दिल्याप्रमाणे ग्रहणाच्या दिवशी या गोष्टी करू नयेत हे पाहूया.....
सोमवार दि. ७ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी ( मुंबई ) चंद्रोदय होईल. त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के प्रकाशित दिसेल. नंतर रात्री १० वाजून ५२ मिनिटानी खंडग्रास चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. चंद्र पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल.
ग्रहणात गरोदर महिलांनी चुकूनही करू नयेत ही कामं....
ग्रहणाचा काळ गरोदर महिलांनी अधिक जपावा असं कायम सगळ्यांकडून सांगितलं जातं. त्या प्रमाणे घरच्या मंडळींकडून काळजी घेतली देखील जाते. खालील गोष्टी गरोदर महिलांनी टाळाव्यात
१) ग्रहणाच्या वेळी म्हणजे ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत काहीही खाऊ नये.
२) यावेळेत साधं पाणी प्राशन न करता फक्त नारळ पाण्याचे सेवन करावे.
३) आणि रात्री दूध-भात खाल्यास उत्तम समजला जातो.
४) त्याचप्रमाणे यावेळी गर्भवती महिलेने गाठ मारू नये.
५) त्यामुळे रक्षाबंधन असले तरीही यावेळी भावाला राखी बांधू नये.
६) तसेच गरोदर महिलेने कोणतीही वस्तू किंवा भाजी यावेळी कापू नये, चिरू नये.
७) तसेच यावेळी गरोदर महिलेने कोणतीही गोष्ट फाडू नये.
८) असे सांगितले जाते की, यावेळी आळस देऊ नये, कुस बदलू नये तसेच लोळायचं देखील नाही.
९) त्यामुळे गरोदर स्त्रीने शांत बसून नामस्मरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो.
१०) त्याचप्रमाणे ग्रहणाच्यावेळी कोणतेही कापड पिळू नये.
११) आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही गोष्ट शिळी खाऊ नये. यामध्ये जेवण, दूध आणि पाण्याचा समावेश आहे.
यानंतर पुढच्या वर्षी बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचेही सांगितले