कायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स
दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.
मुंबई : आपले दात सुंदर चमकदार आणि पांढरे शुभ्र असावेत असं सर्वांना वाटतं, यासाठी दातांची निगा राखणेही तेवढेच महत्वाचे आहे, एवढेच नाही तर काही पथ्य देखील पाळले गेले पाहिजेत.
दात स्वच्छ आणि चमकदार दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.
दातांची निगा राखण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या
दिवसातून २ वेळा दात घासा
कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरा
माऊथवॉशचा वापर करा
तीन महिन्यांना दात घासण्याचा ब्रश बदला
6 महिन्यांनी डेंटिस्टकडून दातांची तपासणी करा
अॅसिडयुक्त पदार्थ तसेच चिकट पदार्थ दातांसाठी अपायकारक
कार्बोनेटेड पेय आणि बर्फ यांनी देखील दातांचं नुकसान
या पदार्थांमुळे तुमच्या दांतांचं नुकसान होऊ शकतं
गोड पदार्थ
मद्यपान
ब्रेड
कार्बोनेटेड पेय
चावण्यास कडक असणारे पदार्थ
बटाट्याचे वेफर्स
जर्दाळू आणि मनूका