मुंबई :  रोजच्या कामांसोबत शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यासाठी अतिरिक्त ताणाची नेमकी लक्षणं समजून घेणं फार आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच उपाय करून आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळता येतील . दिवसभरातील काम आणि घडणाऱ्या घडामोडी यामुळे थोडासा का होईना व्यक्तीला ताण येतोच.


डोकं, छाती, पोट दुखणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर दररोजच्या ताण-तणावाच्या पातळीत वाढ झाली की मायग्रेन सारखे गंभीर समस्याही होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला ताण असेल तर डोकेदुखी, छातीत वेदना जाणवणं, पोटात दुखणं अशा समस्या उद्भवू शकतात.


पचनाच्या समस्या


मळमळ आणि उल्टी या तक्रारीही येऊ शकतात. ताणाचा परिणाम हा पचनक्रियेतवर होतो त्यामुळे अशा समस्या उद्भवतात. तसंच ताणामुळे अनेकांना डायरिया आणि बद्धकोष्ठता अशा समस्याही उद्भवतात.


मानसिक लक्षणं
डिप्रेशन
राग येणं
चिडचिडेपणा
एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत न करणं
स्मरणशक्तीवर परिणाम
योग्य निर्णय न घेऊ शकणं


हृदयाची गती आणि रक्तदाबावर परिणाम


जर ताणाचा हृदयाच्या गतीवर जास्त परिणाम झाला


इतर समस्या


 तर हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते.  
 
ताण अचानक वाढला की हार्मोनवरही त्याचा परिणाम होतो. यामुळे अनेकदा हृदयाची गती वाढणं तसंच रक्तदाबही वाढू शकतो. 


इतर समस्या


ताण-ताणवाचा परिणाम हा फक्त शारीरिक क्रियांवर न होता मानसिक क्रियांवरही होतो. यावेळी महिलांना अनियमित मासिक पाळी किंवा पाळीदरम्यान वेदना होण्याच्या तक्रारी उद्भवतात. 


तर पुरूषांमध्ये स्पर्म्स कमी होण्याचा धोका उद्भवतो.महिलांमध्ये असणाऱ्या ताणाचा परिणाम मासिक पाऴीवरही दिसून येतो.