मुंबई : व्हेजिटेबल कार्व्हिंगच्या माध्यमातून ही रांगोळी साकारण्याचा नवा ट्रेण्ड रुजतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही समारंभातल्या जेवणाच्या पंक्तीला ताटाभोवती रांगोळी काढणं ही महाराष्ट्राची जुनी परंपरा..मात्र काळ बदलला तशी जेवणाच्या पंक्तींची जागा बुफेनं घेतली आणि ताटाभोवतीची रांगोळी गायबच होऊ लागली. मात्र ही परंपरा पुण्यात काहीशा वेगळ्या पध्दतीनं जपली ती उर्मिला पाटणकर यांनी आणि तीही व्हेजिटेबल कार्विंग अर्थात भाज्यांच्या मदतीनं केलेल्या कलाकुसरीतून.


उर्मिला पाटणकर गेली 7 ते 8 वर्षांपासून वेजिटेबल कार्विंगच्या व्यवसायात कार्यरत आहेत...फळं आणि भाज्या वापरुन ताटाभोवती रांगोळी काढण्यात त्यांचा हातखंडा. ही रांगोळी दिसायला मोहकही दिसतेच. त्याचबरोबर नंतर ती खाऊनही फस्त करता येते.


फॅशन डिझायनर असणा-या उर्मिला यांना त्यांच्या एक मैत्रिणीमुळे भाज्यांच्या रांगोळी विषयी माहिती मिळाली,,,,आणि यातच व्यवसाय करण्याची  आयडिया त्यांना सुचली. त्यासाठी कार्विंगचं विशेष प्रशिक्षणही त्यांनी घेतलं...या रांगोळीतली ही  फुलं टोमॅटो, गाजर , मूळा ,काकडी यांसारख्या  भाज्यांपासून  साकारणं तसं किचकट आणि वेळखाऊ आहे... त्यामुळे पुरेसा सराव झाल्यानंतरच त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.   



मूळच्या थायलंडच्या असणा-या व्हेजिटेबल कार्विंग या कलेला सध्या पुण्यातही लोकप्रियता मिळतेय़. 500 रुपयांपासून सुरु होणा-या या रांगोळीला  लग्न , मुंज , डोहाळजेवणसारख्या अनेक समारभांमध्ये  मोठ्या प्रमाणात  मागणी आहे...मात्र व्यवसायाबरोबरच सण समारंभात रांगोळी काढण्याची भारतीय परंपराही जपली जातेय, याचं समाधान जास्त