मुंबई : महिलेच्या शरीरातील एक महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे गर्भाशय. स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हा असा एका अवयव आहे जो आणखी एका अवयवाची निर्मिती करतो. गर्भाशयातील स्नायू हे संपूर्ण शरीरातील इतर स्नायूंपेक्षा मजबूत असतात. मात्र या अवयवाची जितकी प्रमाणात काळजी घेतली पाहिजे तितकी घेतली जात नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकीची जीवनशैली आणि सवयींमुळे महिला या अवयवाचं नुकसान करतात. महिलेच्या निरोगी आरोग्यासाठी आणि प्रजनन क्षमतेसाठी गर्भाशय मजबूत असणं महत्त्वाचं आहे. जाणून घेऊयात निरोगी गर्भाशयासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी.


एकाच ठिकाणी सतत बसून राहू नका


आजकाल कामाच्या ठिकाणी अनेक महिला एकाच ठिकाणी दिर्घकाळ बसून काम करतात. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे पेल्विक भागातील रक्त आणि उर्जेच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे गर्भाशयाचं अस्तर जाड होण्याची शक्यता अधिक वाढते.


शरीरातील टिश्यूजचं पोषण


निरोगी रहाण्यासाठी फॅट्स कमी करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे निरोगी राहण्यासाठी काही प्रमाणात हेल्दी फॅट्स घेणंही महत्त्वाचं असतं. शरीरातील टीश्यू निरोगी रहाण्यासाठी त्यांना हायड्रेट ठेवणं फार महत्त्वाचं असतं. यासाठी सतत भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.


झोपेच्या वेळापत्रकाकडे लक्ष द्या


पुरेशी झोप न घेतल्याने शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी सुट्टीच्या दिवशी देखील वेळेवर झोपलं पाहिजे. झोपेचा प्रजननप्रक्रियेतील हॉर्मोन्सवर परिणाम होत असतो. त्यामुळे नियमित पुरेशी झोप घेणं तुमच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं.