मुंबई : काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास तिने एकटीने केला तो ही चालत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्यांच्यातल्या क्षमतांची त्यांना जाणीव व्हावी, म्हणून ही बाई देशभर फिरतेय. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या या सृष्टी बक्षी...... कन्याकुमारी ते काश्मीर अशी त्यांची सध्या पदयात्रा सुरू आहे.  3 हजार 800 किलोमीटरचा प्रवास त्या पायी करणार आहेत.  15 सप्टेंबरला कन्याकुमारीहून त्यांनी ही मोहीम सुरु केलीय. क्रॉसबो माईल्स नावाने सुरु असलेल्या 260 दिवसांच्या या मोहिमे अंतर्गत त्यांची पदयात्रा नुकतीच नागपूरला पोहोचली.


पदयात्रेच्या दरम्यान त्या विविध गावांत महिलांच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रं घेतात... त्यामध्ये महिला सबलीकरणाच्या दृष्टीनं महिलांना मार्गदर्शन करतात... त्याचबरोबर स्वसंरक्षणाचे धडेही त्या महिलांना देतात.... महिला सक्षमीकरणाच्या संदेशाबरोबरच त्यांची टीम विविध शहरांमध्ये वॉल पेंटिंगही करते.


कोण आहे सृष्टी बक्षी? 


सृष्टी बक्षी हॉगकाँगमध्ये  एका मल्टी नॅशनल कंपनीत उच्चपदावर कार्यरत होत्या. यावेळी त्यांनी बुलंद शहराजवळ  एका मुलीवर व तिच्या आईवर झालेल्या बलात्काराची घटना हायवे 91 रेप केसबद्दल वाचलं. या घटनेची माहिती वाचल्यानंतर सृष्टी पुरत्या हादरल्या. त्यानंतर त्यांनी महिला सबलीकरणाचा ध्यासच घेतला....  त्याअंतर्गतच त्यांनी क्रॉसबोमाईल्स या मोहिमे अंतर्गत ही पदयात्रा सुरू केलीय. 


महिलांची आर्थिक प्रगती व्हावी आणि त्यांना समान अधिकार मिळावेत, यासाठी सृष्टी यांची धडपड सुरू आहे. त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा.