VIDEO:लग्न कायम लक्षात राहण्यासाठी वधुने आपल्या कपड्याला लावली आग
लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. लग्न हे अविस्मरणीय ठरण्यासाठी या वधुने चक्क आपल्या कपड्यांनाच आग लावली.
मुंबई : लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. लग्न हे अविस्मरणीय ठरण्यासाठी या वधुने चक्क आपल्या कपड्यांनाच आग लावली.
कोण लग्न धावत्या रेल्वे, विमानात करतो. तर काही जण हवेत करतात. कोणी पाण्याखाली लग्न करतो. मात्र, फोटो काढण्यासाठी या वधुने आपल्या अंगावरील कपड्यांना पेटवून घेतले. आपला जीव धोक्यात घालून तिने कपड्यांना लागलेल्या आगीचा फोटो काढून घेतला.
या व्हिडिओत एक व्यक्ती वधुच्या कपड्यांना आग लावतो आणि तो निघून जातो. मात्र वधु फोटोसाठी पोज देते आणि फोटो काढून घेते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पाहा हा व्हिडिओ :