मुंबई : गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर आजकाल महिलांद्वारे होताना दिसतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळ्या घेतल्या जातात. मात्र काही महिलांच्या मनात या गोळ्यांविषयी काही समज असल्याचं दिसून येते. इतकंच नव्हे काही महिलांच्या मनात याबाबत भीती देखील पाहायला मिळते. सर्वच वयोगटातील महिलांमध्ये याविषयी गैरसमज आहेत. पण आज जाणून घेऊया नेमकं तथ्य काय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर एखाद्या महिलेला गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपाताची औषधं घेतली पाहिजेत.


गर्भनिरोधक गोळ्यासंदर्भातील गैरसमज


गोळ्यांचा फर्टिलीटीवर होतो परिणाम


गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने महिलांच्या फर्टिलीटीवर परिणाम होता असा समज आहे. मात्र या गोळ्यांमुळे फर्टिलीटीवर परिणाम होतो याबाबत अजून एकंही पुरावा सापडलेला नाही.


वजनात होते वाढ


पूर्वी मिळणाऱ्या काही गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे काही काळासाठी वजनात वाढ होत होती. यामागील कारण म्हणजे शरीरातील द्रव पदार्थांचं प्रमाण या औषधामुळे वाढतं. परिणामी महिलांना वजन वाढल्यासारखं वाटतं. मात्र नव्या प्रकारच्या गोळ्यांमुळे वजन वाढत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. तर दुसरीकडे पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS चा त्रास आहे त्यांना या गोळ्यांमुळे वजन कमी होऊ शकतं.


कोर्सदरम्यान 1-2 वेळा गोळ्या चुकल्या तरी चालेल


तुमच्या डॉक्टरांनी काही विशिष्ठ वेळेसाठी औषधं आहेत. त्यामुळे ती आपण योग्य पद्धतीने घेतली नाहीत तर त्याचे उलट परिणाम दिसू शकतात. अशा परिस्थितीत एक - दोन गोळ्या चुकल्या तर तातडीने आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांचा याबाबत सल्ला घेतला पाहिजे.