मुंबई : योनीमार्गातून होणारा स्राव अनेकदा महिलांच्या आरोग्याबाबत माहिती देतो. हा स्राव चिकट द्रव पदार्थ असतो जो गर्भाशयातील ग्रीवांमधील ग्रंथींनी तयार होतो. यामुळे योनीमार्ग साफ होण्यास मदत होते. मुळात योनीमार्गातून डिस्चार्ज होणं हे अगदी सामान्य आहे. मासिक पाळी येण्यापूर्वी होणाऱ्या डिस्चार्जमुळे अनेकदा महिला चिंतेत पडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यतः होणाऱ्या डिस्चार्जचा रंग हा पांढरा असतो. मात्र अनेकदा डिस्चार्जचा रंग हा वेगळाही असू शकतो. तर आज जाणून घेऊया योनीमार्गावाटे होणारे डिस्चार्ज कोणत्या रंगाचे असू शकतात आणि त्याचा नेमका काय अर्थ आहे.


क्लियर डिस्चार्ज


जर महिलांच्या योनीमार्गातून क्लियर डिस्चार्ज होत असेल तर हे ओव्यूलेशनच्या प्रक्रियेपूर्वी आणि गर्भावस्थेच्या दरम्यान असं होऊ शकतं.


व्हाईट डिस्चार्ज


अशा रंगाच्या डिस्चार्जला सामान्यपणे तीव्र गंध येतो. त्याचप्रमाणे असं असल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. 


पिवळा किंवा हिरवा डिस्चार्ज


जर तुम्ही आहारात काही बदल केला असेल तर पिवळा किंवा हिरवा डिस्चार्ज होण्याची शक्यता असते. 


लाल डिस्चार्ज


मासिकपाळीच्या काळात रक्तस्रावामुळे लाल रंगाचा डिस्चार्ज होऊ शकतो. 


ग्रे डिस्चार्ज


जर योनीमार्गातून ग्रे रंगाचा डिस्चार्ज होत असेल तर हे धोकादायक ठरू शकतं. त्याचप्रमाणे हे बॅक्टीरियल वेजिनोसिसचं कारणंही ठरू शकतं. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.