मकर संक्रांत आणि तिळाचे महत्व काय?
भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला महत्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्व आलेय, हे तुम्हाला माहित आहे का?
मुंबई : भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला महत्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्व आलेय, हे तुम्हाला माहित आहे का?
काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन
थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तीळ-गूळ खाल्ले जातात. तीळ हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता प्राप्त करुन देतात. त्यामुळे थंडीत तिळ खाण्याला प्राधान्य द्यावे.
- अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्या. थंडीचा त्रास कमी होतो आणि शरीरातील उष्णता कायम राहण्यास मदत होते.
- तीळ खाण्यामुळे त्वचा मुलायम राहते. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्वचा कोरडी पडत नाही.
- बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसेल तर तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे. याचा चांगला उपयोग होतो.
- ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
- दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो.
- केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले
- थंडीच्यावेळी लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले. ज्या महिलांना पाळीत कमी रक्तस्त्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो.
- मधुमेह आहे अशांनी संक्रांतीच्या काळात तीळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
- तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.
- आपण भाजीला शेंगदाण्याचा कूट घालतो त्याऐवजी थंडीमध्ये तिळाच्या कूटचा वापर केल्यास लाभदायक असतो. यामुळे भाजीला चव येते.