Silicon Valley Bank collapse : अमेरिकेतील  सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली आहे. या बँकेला टाळे लागले आहे. मात्र, ही बँक दिवखोरीत निघाल्याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. 10 हजार भारतीय स्टार्टअपला याचा फटका बसला आहे.  लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यामुळे भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भारतीय स्टार्टपला मोठा दिलासा मिळू शकतो. 


10 हजार भारतीय स्टार्टअप का आले अडचणीत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल व्हेंचर कॅपिटल असोसिएशन (NVCA) च्या आकडेवारीनुसार, सिलिकॉन व्हॅली बँकेकडे प्रति खातेदार $250,000 पेक्षा जास्त ठेवी असलेली 37,000 पेक्षा जास्त छोटी व्यावसायिक खाती आहेत. बँक बुडाल्याने या छोट्या व्यावसायिकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. बँकेला टाळ लागल्याने पैसे काढता येत नसल्याने कामगारांना पगार कसा द्यायचा असे संकट उभे राहू शकते. याचा थेट परिणाम 10,000 हून अधिक लहान व्यवसाय आणि स्टार्टअपवर होणार आहे.


अमेरिकन सरकारने हात झटकले!


10 हजार भारतीय स्टार्टअप धोक्यात असताना अमेरिकन सरकारने हात झटकले आहेत. अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी सरकार सिलिकॉन व्हॅली बँकेला कोणताही दिलासा देणार नसल्याचे म्हटले आहे. ग्राहकांच्या ठेवीची रक्कम वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा अमेरिकन सरकारने केला आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन $250,000 पर्यंतच्या ठेवींचा विमा करते. पण, अनेक कंपन्या आणि श्रीमंत लोकांच्या बँक खात्यांमध्ये जास्त पैसे आहेत. अशा स्थितीत अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


भारतीय अर्थव्यस्थेला फटका 


सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीचा फटका भारतीय अर्थव्यस्थेला बसला आहे. यामुळे भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम धोक्यात आली आहे. भारतीय स्टार्टअप फील्ड आधीच अनेक अडचणींमध्ये अडकले आहे. 2022 मध्ये, भारतासह जगभरातील अनेक स्टार्टअप्सला टाळे लागले. स्टार्टअपला मिळणाऱ्या निधीतही मोठी कपात झाली आहे. अनेकजण आपले स्टार्टअप सुरु करत असताना ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.  


भारत सरकार काय मदत करणार?


सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याने अडचणीत सापडलेल्या स्टार्टअपला भारत सरकार मदत करणार आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली. स्टार्टअपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेऊन यांना मदत करण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती चंद्रशेखर यांनी दिली.