मुंबई : सध्या सोशल साईट फेसबुक आणि ट्विटरवर टेन इयर चॅलेंज सध्या तुफान ट्रेंडिंगमध्ये आहे. जो तो आपआपले दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो टाकत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला मार्क झुकरबर्गनं टेन इयर चॅलेंज ही कल्पना फेसबुकवर व्हायरल केल्याचे सांगण्यात येते आहे. पण निव्वळ मनोरंजन हा यामागचा हेतू नक्कीच नाही. झुकेरबर्गने हे करताना व्यावसाय़िक दृष्टिकोन समोर ठेवल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. झुकरबर्गने निव्वळ धंदेवाईक हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे.


फेसबुक आणि ट्विटर हा सर्व डेटा फेस रिगग्निशन कंपन्यांना विकण्याची शक्यता आहे. फेसबुककडून अधिकृतरित्या याबाबत काहीही सांगितले नसले तरी या शक्यता नाकारता येत नाहीत. फेसबुकचा डाटा चोरीला जाणार नाही किंवा त्याचा व्यावसायिक वापर होत नाही याची हमी खुद्द झुकेरबर्गही देत नाही. त्यामुळे तुमचा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो सोशल साईटवर अपलोड करताना थोडी काळजी घ्या, असं सांगण्यात आले आहे.