नवी दिल्ली : फेसबुककडून यंदा गेम अवॉर्डमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाला अवॉर्ड देण्यात आला आहे. या १२ वर्षांच्या मुलाने केवळ गेमच बनवला नाही, तर गेमद्वारे आपल्या वडिलांचा जीवही वाचवला आहे. यावर्षी जगातील दिग्गज गेम प्रोग्रामर्समध्ये या मुलाला ग्लोबल सिटीझन रेक्गनाइज इंडिव्ह्युज्युअल अर्वार्डने (Gaming Global Citizen recognizes individuals) सन्मानित करण्यात आलं आहे. या मुलाचं नाव ल्यूक असून तो कॅनडातील रहिवासी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ल्यूकने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडिल गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्यात (Depression) होते. नैराश्यामुळे ते सर्वांपासून वेगळे राहू लागले. कमी बोलणं आणि गुपचूप बंद खोलीत राहिल्यामुळे त्यांच्या नैराश्यात दिवसें-दिवस वाढ होत होती. वडिलांना या नैराश्यातून बाहेर काढलं नाही तर एक दिवस ते आत्महत्या करतील अशी भीती ल्यूकला वाटत असल्याचं त्याने सांगितलं. 


याचदरम्यान, ल्यूकने वडिलांना या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचा एकाकीपणा घालवण्यासाठी 'लेट्स बी वेल' हा व्हिडिओ गेम बनवण्याचा निर्णय घेतला. ल्यूकची ही व्हिडिओ गेमची कल्पना अतिशय योग्यरित्या लागू पडली आणि ल्यूकचे वडील डिप्रेशनमधून बाहेर आले.