नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रभाव जगभरात वाढतोय. संशोधकांनी आपल्या शोधाच्या आधारे दावा केला होता की, या व्हायरसमुळे केवळ 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या लोकांचा मृत्यू होतो. परंतु मंगळवारी 13 वर्षाच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे आता संशोधकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये मंगळवारी एका 13 वर्षाच्या मुलाचा कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांनी मुलाला याआधी कोणतेही आजार नसल्याचं सांगितलंय. यापूर्वी अमेरिकामध्ये काही महिन्यांच्या चिमुकल्याचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर बेल्जियममध्ये 12 वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.


आतापर्यंत अनेक संशोधकांनी दावा केला आहे की, कोरोनामुळे लहान मुलांमध्ये मृत्यू होणाचं प्रमाण कमी आहे. व्हायरसमुळे लहान मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता केवळ 2 टक्क्यांहूनही कमी असल्याचं बोललं जातंय. परंतु आता या प्रकरणांनंतर स्वत: संशोधकही हैराण आहेत. आतापर्यंत अनेक रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, कोरोनामुळे 60 वर्षांवरील व्यक्तींचा किंवा ज्यांना आधीपासूनच आजार, व्याधी आहेत अशा लोकांचा मृत्यू होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. 


जगभरात 8 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढलले आहे. त्यापैकी 42,354 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीननंतर आता इटली, अमेरिका आणि त्यापाठोपाठ स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा 10000वर पोहचला आहे. तर स्पेनमध्ये एका दिवसांत 700हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत एका दिवसात ८३७ बळी गेले. अमेरिकेत मृतांचा आकडा ३८९० इतका झालाय.


याशिवाय बेल्जियममध्ये ७०५, स्वित्झर्लंडमध्ये ४३३, तुर्कीमध्ये २१४ आणि ब्राझीलमध्ये २०२ जणांचा मृत्यू झालाय.