अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिक्षकाने विद्यार्थीला चांगले मार्क देण्याच्या मोबदल्यात तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मेमोरियल हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या स्टीफन ग्रीफीन या 46 वर्षीय शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. 'युएसए टुडे'ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाला मागील महिन्यात अटक झाली आहे.


शाळेने बोलणं टाळलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थिनीशी अयोग्य पद्धतीने रिलेशन ठेवल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार ह्युस्टन शहरामध्ये घडला आहे. हॅरीस काऊंटी जिल्हा क्लर्कने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये 7 डिसेंबर रोजी स्टीफनला अटक करण्यात आली. स्टीफनला अटक करण्यात आली तेव्हा तो ह्युस्टनमध्येच वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणावर 'युएस टुडे'ला शाळेने तातडीने कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. 


घरी, कारमध्ये अगदी वर्गातही सेक्स


पोलिकांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये पीडित विद्यार्थ्याच्या आईने मुख्यध्यापकांची भेट घेतली. आईने हा शिक्षक मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी पीडित 18 वर्षीय विद्यार्थिनीकडे घडलेल्या प्रकरणाबद्दल चौकशी केली असताना तिने सप्टेंबर 2022 मध्ये हे रिलेशन सुरु झाल्याचं सांगितलं. शिक्षकाबरोबर मेसेज आणि ईमेलवरुन केलेल्या संवादही या तरुणीने पोलिसांना दाखवला. 2022-2023 दरम्यान शाळेत असताना या 18 वर्षीय मुलीने अनेकदा स्टीफन ग्रीफीनबरोबर शरीरसंबंध ठेवले. स्टीफन ग्रीफीनच्या घरी या दोघांनी अनेकदा सेक्स केला. काही वेळेस कार आणि वर्गातही या दोघांनी सेक्स केल्याची कबुली पीडित तरुणीने दिली आहे, असं कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये नमूद केलं आहे.


पूर्ण मार्क देत जाळ्यात फसवलं


स्टीफन ग्रीफीनची घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना तो एकटाच वेगळा राहायला आला होता. तो आधी हॉटेलमध्ये राहायचा नंतर तो एका भाड्याच्या रुमममध्ये राहू लागला. स्टीफन ग्रीफीननेच आधी या विद्यार्थिनीबरोबर जवळीक साधली. स्टीफन ग्रीफीन या पीडित मुलीला क्लासमधील असाइनमेंटमधील उत्तरं तसेच घरच्या अभ्यासाला अधिक गुण देऊ लागला. "तो तिला घरच्या अभ्यासासाठी 100 टक्के मार्क देऊ लागला," असं कोर्टासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे. स्टीफन ग्रीफीनने या विद्यार्थिनीला त्याच्या काही खासगी वस्तूही भेट म्हणून दिलेल्या.


आत्महत्येची धमकी


अगदी 2023 च्या उन्हाळ्यापर्यंत स्टीफन ग्रीफीन आणि या विद्यार्थिनीने शरीरसंबंध ठेवले होते. पोलिसांना सापडलेल्या फोन कॉल रेकॉर्ड्स अन् फोनवरील डेटामध्ये स्टीफन ग्रीफीनने ऑक्टोबर महिन्यात पीडितेचा शेवटचा मेसेज केला होता. मला मेसेज करत जाऊ नकोस. मी आणि माझी बायको पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं स्टीफन ग्रीफीनने या पीडितेला सांगितलं. पीडितेने तक्रार नोंदवल्याचं समजल्यानंतर स्टीफन ग्रीफीनने तिला मेसेज करुन मी स्वत:चं काहीतरी बरं वाईट करुन घेईल अशी धमकी देणारे मेसेज पाठवले. 


"आपण बोललं पाहिजे. मला तुझी फार आठवण येते. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येतात. असं करु नकोस तू. तुला पैसे हवेत का?" असे मेसेज स्टीफन ग्रीफीनने मुलीला केल्याचं कोर्टासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे. कोर्टाने दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात 5 हजार अमेरिकी डॉलर्सच्या जातमुचलक्यावर स्टीफन ग्रीफीनची सुटका केली आहे. 17 वर्षांखालील कोणत्याही मुलीशी संपर्क करु नये अशी अट स्टीफन ग्रीफीनसमोर कोर्टाने ठेवली आहे.