सोशल मीडियामुळे (Social Media) सध्या रोज नवे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. या सोशल मीडियामुळेच अनेक सर्वसामान्यही प्रसिद्ध झाले आहेत. पण एकदा मिळालेली प्रसिद्धी कायम राहावी यासाठी मग वेगवेगळे प्रयत्न, प्रयोग सुरु होतात. त्यातून अनेकदा मर्यादाही ओलांडल्या जातात. नुकतंच सोशल मीडियावर 19 वर्षाच्या तरुणाने असा काही दावा केला की सर्वांनाच धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली 76 वर्षीय प्रेयसी गर्भवती (Pregnant) असून लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचा दावा या तरुणाने केला. इतकंच नाही, तर त्याने महिलेसह आपला फोटोही शेअर केला होता. पण यानंतर सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आणि युजर्स टीका करु लागले. 


डेली स्टारच्या वृत्तानुसार, या तरुणाचं नाव जोसेफ आहे. इटलीचा रहिवासी असणारा 19 वर्षीय जोसेफ सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 80 हजार फॉलोअर्स आहेत. नुकतंच त्याने आपल्या खासगी आयुष्याशी संबंधित एक व्हिडीओ शेअर केला होता. 


या व्हिडीओत त्याने आपली प्रेयसी आपल्यापेक्षा 57 वर्षाने मोठी असून गर्भवती असल्याचं सांगितलं होतं. तसंच लवकरच ती बाळाला जन्म देणार असल्याची माहितीही त्याने दिली होती. जोसेफने आपल्या प्रेयसीचं नाव मिलिना गट्टा असं आहे. मात्र जोसेफने जेव्हा सत्य सांगितलं तेव्हा परिस्थिती वेगळीच असल्याचं समोर आलं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर युजर्स संतापले आहेत. 


2022 मध्ये जोसेफ आणि मिलिना व्हायरल झाले होते. यावेळी त्यानी आपल्या नात्याचा खुलासा केला होता. त्यावेळीही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. लोकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. अनेकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. पण या टीकेकडे लक्ष न देता या जोडीने गर्भवती असल्याची बातमी देत सोशल मीडियावर खळबळ माजवली होती. त्यातच आता त्यांना पुन्हा ट्रोल केलं जात आहे. 


एका युजरने या वयात 'ती गर्भवती होणं शक्य नसल्याचं' म्हटलं होतं. तर एकाने 'ही महिला तुझ्या आजीच्या वयाची आहे, काहीतरी लाज बाळग' असं म्हटलं होतं. तर एकाने हा प्रँक असून व्हायरल होण्यासाठी सर्व काही केलं जात आहे असा दावा केला होता. 


जोसेफने सांगितलं सत्य


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जोसेफने खुलासा करत आपलं नातं खोटं असल्याचं उघड केलं आहे. मिलिना जोसेफची आजी आहे. जोसेफने सांगितलं आहे की, सुरुवातीला आपण मजेशीरपणे व्हिडीओ अपलोड केला होता. तो व्हिडीओ फार व्हायरल झाला. यानंतर आपण हे असंच पुढे सुरु ठेवण्याचं ठरवलं होतं. 


दरम्यान, जोसेफने खुलासा केल्यानंतर युजर्स पुन्हा एकदा त्यांना ट्रोल करत असून संताप व्यक्त करत आहेत.