मुंबई : पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था 'आयएसआय' (ISI) तालिबान (Taliban), जैश-ए-मोहम्मद आणि इसिसच्या ( ISIS) दहशतवाद्यांच्या मदतीने अफगाणिस्तानात (Afghanistan) मोठे दहशतवादी हल्ले करण्यात गुंतली आहे. अफगाणिस्तानात अनेक हल्ल्यांमध्ये आयएसआयचा (ISI) सहभाग असल्याचा पुरावा यापूर्वी सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, स्फोटक खुलाशांविषयी बोलताना आयएसआयच्या (ISI) मदतीने पाकिस्तानमधून अफगाणिस्तानात जाऊन आयएसआयएसचे दहशतवादी बनलेल्या 24 महिला दहशतवाद्यांची यादी झी न्यूजच्या  (Zee News) हाती लागली आहे. या दहशतवादी महिला अफगाणिस्तानात काबुल तुरूंगात कैद आहेत. या महिलांविषयी अफगाणिस्तानच्या एजन्सींचे म्हणणे आहे की या सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळले आहे.


ISIच्या छावणीत 'टेरर फॅमिली प्लॅनिंग'


या प्रकरणाशी संबंधित माहितीनुसार, पाकिस्तान-अफगाणीस्त सीमेवर अफगाणिस्तानच्या क्षेत्रात, आयएसआयने तालिबानी, जैश आणि इसिसच्या दहशतवाद्यांची अनेक दहशतवादी शिबिरे सुरु केली आहेत, ज्यात मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. येथून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी अफगाणिस्तानात हल्ले घडवून आणत आहेत.


त्याचवेळी  काही दहशतवाद्यांना भारताच्या काश्मीरमध्ये  (Kashmir) हल्ला करण्यासाठी पाठवले जाते. त्यांना भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास सांगितले जाते. यातील बरेच दहशतवादी कुटुंबासह म्हणजेच संपूर्ण कुटुंबासमवेत येतात आणि दहशतवादी छावण्यांमध्ये सामील होतात, अशी माहिती पुढे आली आहे.


टार्गेट ठरविण्याबाबत ISIची भूमिका


अफगाणिस्तानच्या घटनांवर नजर टाकले तर अफगाणिस्तान सुरक्षा दलांच्या कारवाईत पकडलेल्या पाकिस्तानी वंशाच्या काही  ISIS दहशतवाद्यांनी खुलासा केला आहे की त्यांना ISIकडून कधी आणि कोठे हल्ले करायचे याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ISI शस्त्रे पुरवतत, असा दावाही त्यांनी केला आहे.


पाकिस्तानला काळ्या यादीत जाण्याची भीती


'झी मीडिया'ला मिळालेल्या माहितीनुसार,  ISIS मध्ये सहभागी होऊन दहशतवादी कटात सामील झाल्याचा आरोप असलेल्या 24 महिला अफगाणिस्तानातील जेलमध्ये कैद आहेत. तेथेही त्यांची 46 मुलेही आहेत. Financial Action Task Force (FATF) च्या बैठकीपूर्वी या प्रकरणात ISI च्या सहभागाची बाब जगासमोर आली तर त्याचा वाईट परिणाम होईल, अशी पाकिस्तानला भीती आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानलाही काळ्या यादीत टाकले जाऊ शकते.


15 दिवसांपूर्वी सापडला पुरावा 


अफगाणिस्तानात उपस्थित असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या पथकाने यावर्षी 30 मे रोजी काबुलचा दौरा केला. त्यावेळी काबुल कारागृहात गुप्तपणे भेट दिली आणि  ISIS संबंधित महिलांची भेट घेतली, असी माहिती पुढे आली आहे. त्यांच्या अहवालानुसार पाकिस्तानी वंशाच्या एकूण 30 महिला आणि त्यांची 60 मुले सध्या अफगाण कारागृहात कैद आहेत.


या दहशतवादी महिला कुटुंबीयांचा सरकारवर दबाव वाढत असूनत्यांना देशात परत आणण्यासाठी मागणी करत आहे. म्हणूनच, पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानात उपस्थित असलेल्या त्यांच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांना त्यांची नावे आणि पत्त्यांची माहिती एकत्रित करण्यास सांगितले आहे, जेणेकरून पडताळणीनंतर त्यांच्या परतीची प्रक्रिया सुरू करता येईल.


जेलमधील महिलांची Exclusive यादी


या 24 पाकिस्तानी महिला अफगाणिस्तानातील काबुल तुरूंगात कैद आहेत.


1-फातिमा झिया- लाहोर
2-अतिका- कराची
3-सिद्रा- लाहोर
4- हसीना- क्वेटा
5-रड्डा- नरोवाल
6-हजेरा- खैबर
7-तैय्यबा- Orakzai
8-खादीजा-दिर, KPK
9-जैनाब-दिर, KPK
10-रवाझा- Orakzai
11-शाहिदा- Orakzai
12-हायद- Orakzai
13-शकील- KPK
14-मरियम- KPK
15-अम्माना रजाक- जलालपूर
16-हाजिरा- Orakzai
17-शहनाझ- Orakzai
18-एख्तिरा- Orakzai
१--अदिबा- जलालपूर
20-आयेशा- Orakzai
21-गुलाब- Orakzai
22-जमीना- Orakzai
23-हिफ्सा- लाहोर
24-जामनखिला- Orakzai