Viral News: लग्न म्हटलं तर आपण जोडीदाराच्या शिक्षणापासून ते त्याच्या वयापर्यंत सर्व गोष्टी तपासून पाहत असतो. आपल्या भावी जोडीदाराच्या वयात आणि आपल्यात जास्तीत जास्त पाच वर्षांचं अंतर असावं असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. यामागे एकमेकांचे विचार जुळणं यासह इतर अनेक कारणंही असतात. पण आंधळ्या प्रेमात ही गोष्ट जास्त महत्त्वाची नसते. जेव्हा प्रेम होतं तेव्हा रंग, वय, नोकरी या गोष्टी दुय्यम होतात. सोशल मीडियावर अशाच एका लग्नाची सध्या चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिलेने आपल्यापेक्षा तब्बल 26 वर्ष लहान तरुणाशी लग्न केलं आहे. महिलेचं वय 48 असून तरुण फक्त 22 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे महिला शिक्षिका असून तरुण तिचा विद्यार्थी आहे. शाळेतच त्यांची भेट झाली होती. यानंतर तरुणाने थेट आपल्या शिक्षिकेलाच लग्नाची मागणी घातली. यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले. हे प्रकरण मलेशियामधील आहे. 


मलेशियामधील New Stratis Times ने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणाचं नाव मोहम्मद डानियाल अहमद अली आहे. तर त्याची शिक्षिका आणि सध्याच्या पत्नीचं नाव जमीला मोहम्मद आहे. 2016 मध्ये जेव्हा डानियाल ज्युनिअर हायस्कूलमध्ये शिकत होता तेव्हा जमीला त्याची शिक्षिका होती.  


डानियाल याचा तेव्हाच जमीला आवडू लागल्या होत्या. त्याला जमीला याचंचा स्वभाव तसंच ज्याप्रकारे त्या विद्यार्थ्यांची काळजी घ्यायच्या हे त्याला आवडायचं. पण जेव्हा डानियाल वरच्या वर्गात गेला तेव्हा त्याचा जमील यांच्याशी संपर्क तुटला. पण नंतर पुन्हा त्यांची भेट झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. 


एकदा डानियालने जमीला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झालं. याचरदम्यान डानियालने जमीला यांना प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. पण जमीला यांनी डानियाल वयाने फार छोटा असल्याने, तसंच तो आपला विद्यार्थी असल्याने प्रपोज नाकारलं. पण डानियाल माघार घेण्यास तयार नव्हता. त्याने त्यानंतरही प्रयत्न सुरु ठेवले. 


डानियालने जमीला यांच्या घऱाचा पत्ता मिळवला आणि घर गाठत पुन्हा एकदा प्रपोज केलं. दोघांमध्ये यावेळी बराच वेळ चर्चा झाली. यानंतर अखेर जमीला यांनी त्याची मागणी मान्य केली. यानंतर दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना या लग्नासाठी तयार केलं. 


22 वर्षाच्या डानियालने आफल्या 48 वर्षीय शिक्षिकेशी 2021 मध्ये लग्न केलं. एका मशिदीत त्यांचं लग्न झालं. या लग्नाता त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. 


रिपोर्टनुसार, जमीला 2007 मध्ये आपल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. यानंतर त्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होत्या. 2021 मध्ये डानियालशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला नवं वळण मिळालं आहे. सध्या दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत.