सोल : दक्षिण कोरियामध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोरियातील जेशेऑन या शहरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. जेशेऑन शहरातील आठ मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत २९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, २९ नागरिक जखमी झाले आहेत. 


या इमारतीमध्ये एक फिटनेस सेंटर आणि रेस्ट्रॉही होते. आपातकालीन परिस्थितीत इमारतीतून बाहेर पडण्याची योग्य आणि पर्यायी व्यवस्था नसल्याने हा मोठा अपघात घडल्याचं बोललं जात आहे.


इमारतीमध्ये ज्वलनशील पदार्थ तसेच अवैधरित्या पार्क केलेल्या कार्समुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा येत होता. 


या आगीचा व्हिडिओ समोर आला आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की, आग वेगाने वरच्या मजल्यांवर पसरत आहे.


एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, आग लागल्यानंतर स्फोटांचेही आवाज आले. तसेच ज्वलनशील पदार्थांमुळेच आग वेगाने पसरली.


आगीने अल्पावधित रौद्र रुप धारण केल्याने आग पसरली. या आगीने अवघ्या सात ते आठ मिनिटांतच संपूर्ण इमारतीला वेढले.


या आगीची तुलना अनेकांनी लंडनमधील ग्रेनफेल टॉवर येथे लागलेल्या आगीसोबत केली आहे. या टॉवरला लागलेली आग इतकी भीषण होती की, आगीत तब्बल ७१ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला होता.