तेल अव्हिव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इस्राइलमधील भारतीयांना संबोधित करताना प्रगतीच्या दिशेने झेपावणाऱ्या युवा भारताचे चित्र सादर केले. भारत आणि इस्त्रायल  मिऴून जग बदलू शकतात हा विश्वास मोदींनी आपल्या भाषणात दिला.


इस्राइलच्या ऐतिहासिक भेटीवेळी दिल्ली-मुंबई-तेल अव्हिव  विमानसेवा, इस्राइलमध्ये इंडियन कल्चरल सेंटरची स्थापना आणि ज्या भारतीयांनी इस्राइलमध्ये अनिवार्य लष्करी सेवा दिली आहे अशांसाठी ओसीआय कार्ड देणे अशा 3 महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी यावेळी केल्या. यावेळी  भारतीय पंतप्रधानांच्या पहिल्या इस्राइल दौऱ्याला 70 वर्षे लागल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली. यावेळी मोदीनी ज्यू धर्मीय ई. मोझेस यांनी 1938 साली मुंबईचे महापौरपद भूषवले होते त्याची आठवण करुन दिली. इस्राइलमध्ये मराठी नियतकालिक मायबोलीचे प्रकाशन होते हे ऐकून आनंद झाल्याची भावनाही बोलून दाखवली.