albert einstein letter : अल्बर्ट आईनस्टाईन म्हणजे महान भौतिकशास्त्रज्ञ... याच आईनस्टाईनच्या एका सहीची किंमत ऐकूणच तुमचे डोळे पांढरे होतील.. कारण आईनस्टाईन यांची सही असलेल्या एका पत्राला थोडीथोडकी नाही तर 33 कोटींची किंमत मिळालीय.. हे पत्र आईनस्टाईन यांनी 1939 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती रुझवेल्ट यांना लिहिलं होतं...  न्यूयॉर्कमधील फँकलिन डी रुझवेल्ट यांच्या लायब्ररीत हे पत्र सापडलं होतं.. या पत्रात आईनस्टाईन यांनी अणुबॉम्बच्या धोक्याबाबतचा इशारा दिला होता.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1939 साली अल्बर्ट आईनस्टाईन यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांना पत्र लिहलं होतं.. त्यांनी पत्रातून अणूबॉम्बच्या हल्ल्याच्या धोक्याबाबत माहिती दिली होती.  जर्मनी अणूबॉम्ब हत्यारं तयार करण्याचं काम करत आहे.   अमेरिकेच्या सरकारलाही पत्रातून आईनस्टाईन यांनी सतर्क केलं होतं. 


युरेनियमला उर्जा स्त्रोतात रुपांतरित करता येऊ शकतं.   त्याद्वारे अत्यंत शक्तिशाली विस्फोटक तयार केलं जाऊ शकतं. तसेच अमेरिकेनं अणूबॉम्बवर संशोधन करण्याचा सल्लाही दिला.  मॅनहॅटन या अमेरिकेच्या गुप्त अणुबॉम्ब प्रकल्पाला यानंतरच सुरुवात झाली असं मानण्यात येतं.. अमेरिकेने दुस-या महायुद्धात जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला केला होता.  जवळपास 2 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावर आईनस्टाईन यांनी दु;खही व्यक्त केलं होतं. मात्र त्याआधीच आईनस्टाईन यांनी अणुबॉम्बबाबत इशारा देणारा हे पत्र लिहिल्याने जगातल्या सर्वात प्रभावशाली पत्रात त्याचा समावेश केला जातो.. माईक्रोसॉफ्टचे पॉल एलन यांनी हे पत्र 2002 साली 21 लाख डॉलरला खरेदी केलं होतं.. याच पत्राचा आता 33 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आल्यानं या पत्राची पुन्हा चर्चा सुरू झालीय..