नवी दिल्ली : गलवानमध्ये झालेल्या चकमकीत 4 सैनिक ठार झाल्याचं चीनने प्रथमच म्हटलंय. गलवानमध्ये भारताच्या 20 सैनिकांना हौतात्म्य आलं. चीनचे दुप्पट सैनिक ठार झाल्याचं म्हटलं जात होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आजवर गलवानमध्ये नेमकी किती हानी झाली याचा आकडा चीन जाहीर करत नव्हतं. मात्र आता चीनने केवळ 4 सैनिक ठार झाल्याचं म्हटलंय. चेन होंगजुन, चेन जिआनग्रोंग, जिओ सियुआन, वँग झुओरान अशी या चार सैनिकांची नावं असल्याचं चीनने म्हटलंय. 



परदेशी आक्रमकांविरोधात लढताना हे सैनिक ठार झाल्याचं चीनने म्हटलंय. या चार सैनिकांपैकी चेन जिआनग्रोंगला मरणोत्तर चीनने गार्डिअन ऑफ फ्रंटियर हिरो हा शौर्यकिताब दिलाय. तर उर्वरीत तिघांना शौर्य पुरस्कार जाहीर केलाय.