स्कॉटलंड : स्कॉटलंडच्या एबर्जीनशायरमध्ये शनिवारी रात्री एक अजब प्रकार समोर आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुर्वोत्तर पोलीस डिव्हीजनच्या अधिकाऱ्यांना रात्री फोन आला.


फोन करणारी व्यक्ती घाबरली होती.


कोणतातरी खतरनाक प्राणी इथे असल्याचे त्याने कॉलवर सांगितले.


खतरनाक प्राणी 


 पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी आपली टीम पाठवली.


त्यानंतर पोलिसांनी वनअधिकाऱ्यांना फोन करुन कोणता खतरनाक प्राणी तिकडून पळालाय का ? याबद्दल विचारणा केली. 


४५ मिनिटांची भिडंत 


 दरम्यान पोलीस कॉल वर सांगितलेल्या पत्त्यावरील शेतात पोहोचली होती. साधारण ४५ मिनिटं त्याच्यासोबत भिडल्यानंतर तो वाघ असल्याचे पोलिसांना काहींनी सांगितले.


यानंतर स्थानिकांची चांगलीच भांबेरी उडाली. पण पोलीस मागे हटले नाहीत.


त्यांनी झुंज सुरूच ठेवली. 


४५ मिनिंटांनतर पोलिसांना त्या जागेवर वाघ नसून खेळणं असल्याचे निदर्शनास आले. 


लोकांमध्ये हशा 


 'यूके कॉप ह्यूमर' नावाच्या फेसबूक पेजवर या घटनेसंदर्भात लिहिले आहे. खेळण्याचा फोटोही यासोबत शेअर करण्यात आलायं.


या पोस्टवर नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीए. १,०४४ जणांनी ही पोस्ट शेअर केलीए.


याशिवाय ३.९ हजार जणांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. 



प्रॅंक कॉल नव्हता


हा कोणता प्रॅंक कॉल नव्हता, त्या व्यक्तीने लोकांचे प्राण वाचविण्याच्या उद्देशाने हा फोन पोलिसांना केला होता, असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.