मुंबई : कोरोनाचा नाश झाला तरी नंतर मात्र लोकांचा नोकऱ्या घालवूनच जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) यांनी एक गंभीर इशारा दिला आहे की कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे जगातील जवळपास निम्म्या कामगारांच्या नोकर्‍या जातील.


आयएलओ काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयएलओने म्हटले आहे की, जगभरातील असंघटित क्षेत्रातील १.६ अब्ज कामगारांना रोजगार गमावण्याच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. ही संख्या जगातील संपूर्ण कर्मचार्‍यांपैकी निम्मी आहे.


आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) म्हटले आहे की कोरोनामुळे ४३ कोटीहून अधिक उपक्रम प्रभावित झाले असून यामध्ये किरकोळ आणि उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे.


बुधवारी प्रकाशित झालेल्या आयएलओ मॉनिटर 'कोविड -१९ आणि वर्ल्ड ऑफ वर्क' च्या तिसर्‍या आवृत्तीत असे म्हटले की, जागतिक स्तरावर सुमारे 3.3 अब्ज कामगार आहेत. असंघटित अर्थव्यवस्थेत जवळपास दोन अब्ज रोजगार आहेत आणि हे असे कामगार आहेत ज्यांच्या नोकर्‍या सर्वाधिक धोक्यात आहेत.


आयएलओचे महासंचालक गाय रेडर यांनी म्हटलं की, साथीच्या आणि नोकरीच्या संकटामुळे या कामगारांचे जीवन निर्वाहाची व्यवस्था करणे अत्यंत महत्वाचे बनले आहे. ते म्हणाले की लाखो कामगारांकडे कमाईचं साधन नसल्याने त्यांना अन्न मिळवणं कठीण होऊन जाईल. ज्यामुळे त्यांचं भविष्य संकटात येईल.


वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, आयएलओने म्हटले आहे की कोविड -१९ या साथीच्या आजारामुळे झालेल्या आर्थिक घसरणीमुळे असंघटित क्षेत्रातील १.६ अब्ज लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


विशेष म्हणजे कोरोना साथीच्या आजारामुळे जगातील जवळपास एक तृतीयांश देश लॉकडाऊनमध्ये आहेत आणि बहुतेक देशांची अर्थव्यवस्था ही ढासळली आहे.